Thursday, 4 July 2013

कुणी

कुणी दाद द्यावी म्हणून कुणी लिहीत नाही
कुणी टाळी द्यावी म्हणून कुणी गात नाही
लिहिणारा लिहीत जातो
गाणारा गात जातो
कारण लिहिणं आणि गाण
हेच असत   त्यांचं जगणं
असं  जगणं काय असत
हे फक्त त्यांनाच कळत
प्रियंवदा करंडे

Wednesday, 3 July 2013

एवढच हव

धावणार्‍या काळाला थांबवू नकोस
वाढणार्‍या वयाला अडवू नकोस 
कारण ते तुझ्या हातात नाही
पण काळजातल्या उर्मीला जपून ठेव
काळाला धावू दे
वयाला वाढू दे
पण तुझी भाळून जायची उर्मी मात्र
आहे  तशीच राहू दे
प्रियंवदा करंडे

Sunday, 30 June 2013

लघुकविता
सांगा
कधीतरी गळायच म्हणून फुलाने फुलायच च नाही का?
कधीतरी मावळायच म्हणून सूर्याने उगवायचच नाही का?
कधीतरी  निखळायच म्हणून तार्‍याने चमकायचच नाही का?
कधीतंरी जळायच म्हणून कुणी प्रेम करायचच नाही का?
कधीतरी मरायच म्हणून माणसाने जगायचच नाही का?
काही लघुकविता
फूल  जेव्हा  फुलत  असत
 तेव्हाच  त्याला  पाहून घ्यावं
बहरण्यार्‍या  प्रत्येक  क्षणात
त्याचवेळी  न्हाऊन  घ्यावं


2)पंरीकथेत  छान  छान
स्वप्नाचे  पंख असतात

तुमच्या  आमच्या  कथेत  फक्त
वेदनाचे  डंख  असतात

New Post

I am a published award-winning author who has been writing articles, stories and poems for the last 45 years. Through this medium, I hope to explore technology and ensure my writing spreads all over the world. Looking forward for your feedback and support.